देहूरोड प्रतिनिधी दि. १० एप्रिल २०२४
देहूरोड पोलीस ठाण्याच्या वतीने शांतता कमिटीची बैठक देहूरोड पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आली होती
देहूरोड येथील पोलीस ठाण्यात आगामी रमजान ईद, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, व रामनवमी सणाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून (बुधवार)दि. १० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता शांतता कमिटीची बैठक झाली.
देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे म्हणाले, देहूरोड शहरात कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत सण साजरे करा.
सण समारंभाच्या माध्यमातून सलोखा निर्माण होतो.
११ एप्रिल रोजी रमजान ईद असल्याने देहूरोड शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देहूरोड पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे,
याचप्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती,रामनवमी उत्सवाच्या वेळी हि चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी देहूरोड शहरातील विविध विषयांवर चर्चा झाली.
यावेळी प्रवीण झेंडे,धर्मपाल तंतरपाळे,संदीप बालघरे सूर्यकांत सुर्वे,रमेश पवार, दिलीप नायर,चंद्रशेखर पात्रे, रजाक साहेबलाल शेख, मुकेश फाले,प्रशांत जोगदंड, इंद्रपालसिंग रत्तू,अमोल नाईकनवरे,मिकी कोचर, गफूर शेख,प्रदीप काळोखे,नागेश म्हेत्रे, सागर निकम,शिवकुमार मुर्गन ,कृष्णा दाभोळे,हाजीमलंग मारीमुत्तू ,आकाश,दीपक चौगुले,धनराज शिंदे, मलिक शेख, तसेच देहूरोड शहरातील राजकीय सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार,व नागरिक उपस्थित होते.