पुणे खबर वृत्तसेवा, देहूरोड दि.२१ एप्रिल २०२४
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड विभागातील सर्व शाळांमध्ये दि. २० एप्रिल २०२४ रोजी शाळा पूर्व तयारी चा पहिला मेळावा केंद्रप्रमुख एम.एफ. खान मॅडम आणि सुलभक नीता मुदलीयार व सौ. रिजवाना तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यात इयत्ता पहिली दाखल पात्र ८९ विद्यार्थी ८२ पालक उपस्थित होते. अंगणवाडी सेविका smc कमिटी सदस्य सर्व शाळांचे मुख्याध्यापक ,इन्चार्ज , सर्व शिक्षक शाळा उपस्थित होते. सदर मेळाव्यामध्ये विविध कृतींचे स्टॉल लावण्यात आले होते नोंदणी ,शारीरिक विकास, बौद्धिक विकास सामाजिक, आणि भावनिक विकास ,भाषा विकास गणना पूर्वतयारी, मार्गदर्शन आणि साहित्य वाटप करण्यात आले,केंद्रप्रमुख एम एफ खान यांनी अंगणवाडी सेविका बालवाडी सेविका माता पालक व शिक्षक वर्ग यांना मार्गदर्शन केले सीनियर मुख्याध्यापक यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले, माता पालक अंगणवाडी सेविका शिक्षक व विद्यार्थी सहा ते आठ आठवड्याचा अभ्यास यशस्वीरित्या राबवण्यासाठी शुभेच्छा पर भाषण केले. दाखल पात्र विद्यार्थ्यांना सात टेबल वरील कृतींचे मूल्यांकन करून विकास पत्र मेळाव्या क्रमांक एकचे भरून पालकांना साहित्य वाटप केले . मेळाव्यात पहिली दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचा उत्साह आनंद व आत्मविश्वास वाढवण्याचा उत्कृष्ट प्रयत्न सर्व शिक्षक मुख्याध्यापक व वर्गशिक्षक यांच्यामार्फत वाढवण्यात आला. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड विभागातील सर्व शाळांनी सहभागी होवून पहिला मेळावा यशस्वीपणे पार पाडला.