पुणे प्रतिनिधी दि.१ ऑगस्ट
सद्या सर्वत्र मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असल्याचे दिसते . त्याला पायबंद घालणे हे नागरीकांचेच कर्तव्य आहे .
पण राजकिय दबाव, दहशतीमुळे माणूस याला विरोध करीत नाही . त्यामुळे संघटनात्मक बांधणी करून स्थापन झालेल्या भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश या संघटनेने लढावू कार्यकर्त्यांना संधी देत महाराष्ट्रभर बांधणी सुरू केली असून त्याचाच एक भाग म्हणून शिरूर तालुक्यातील पाबळ येथील लढावू कार्यकर्ते बाबा इनामदार यांची पुणे जिल्हा ग्रामीण विभागाच्या संपर्क प्रमुखपदी निवड केली आहे .
बाबा इनामदार हे या भागातील झुंजार पत्रकार आणि अन्यायाविरोधात आवाज उठविणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात .
नुकतेच त्यांना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांनी नियुक्तीचे पत्र दिले असून आपण संघटनेच्या कार्याला बळकटी देणार असल्याचे बाबा इनामदार यांनी सांगीतले . जिल्ह्याच्या संपर्क प्रमुखपदी निवड झाल्याने परिसरात त्यांचे कौतुक होत आहे .